मित्रांनो,आपल्याला माहित असेल की भारतामध्ये अगदी पूर्वीच्या काळापासून आपण गुळाचा वापर करत होतो.मात्र अलिकडील काही वर्षामध्ये गुळापेक्षा साखरेचं प्रमाण हे जास्त वाढलय आणि साखरेच्या या वाढलेल्या प्रमाणाबरोबरच अनेक रोग देखील आपल्या जीवनात प्रवेश करून आपले जीवन हे रोगग्रस्त करत आहेत आणि म्हणूनच या गुळ खाण्याचे गुणकारी फायदे कोणते आहेत हे आपण यामध्ये पाहणार आहोत.
गुळ खाण्याचे गुणकारी फायदे |
2) एनीमिया : गुळामध्ये आयर्न म्हणजेच लोहाचा समावेश असतो आणि त्यामुळे जर आपण सकाळी पाण्यासोबत गुळाचं सेवन केलं तर एनीमियाचा त्रास दूर होऊ शकतो.
3) थकवा : मित्रांनो,आजचं जीवन हे धावपळीचं जीवन बनलयं आणि त्यामुळेच जर आपल्याला खूप जास्त थकवा जाणवत असेल तर तेव्हा देखील गुळ खाणं फायदेशीर ठरू शकत.थकवा जाणवल्यास थोडासा गुळ पाण्यासोबत घ्या.त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
4) गॅस आणि अपचन : अनेकांना गॅस आणि अपचनाच्या समस्यांना सामना करावा लागतो.गुळाचं सेवन केल्याने,विशेषतः जेवन झाल्यानंतर जर आपण थोडासा गुळ खाल्ला तर अपचानाची समस्या दूर होऊन पचन चांगल होण्यास मदत होते.तसेच गॅसची समस्या देखील दूर होऊ शकते.
5) दमा : दम्याचा त्रास जर होत असेल तर आपण गुळ खावा. गुळामुळे आपल्याला दम्यापासून मुक्ती मिळेल. गुळामध्ये अँटी ऍलर्जिक तत्व असतात जे दम्याला आराम देतात.तसेच शरीरातील तापमान नियंत्रित ठेवतात आणि परिणामी दम्याचा त्रास कमी होतो.
6) श्वास संबंधित त्रास : मित्रांनो अनेक जणांना श्वासा संबंधित त्रास असतात तर त्यावर देखील गुळ फायदेशीर ठरू शकतो.पाच ग्रॅम गुळ तितक्याच सरसोच्या तेलात मिसळून तो खावा त्याने श्वासा संबंधी समस्या दूर होऊ शकतात.
7) घसा बसणे : अनेकांचा जॉब हा बोलण्याचा असतो. उदा.शिक्षक. जर अशा लोकांचा घसा बसला असेल तर या घसा बसण्यावर गुळाने आराम मिळू शकतो. त्यासाठी आपण शिजलेल्या भाताबरोबर गुळाचे सेवन करा, तुमचा घसा नक्की बरा होईल.
8) कानदुखी : जर आपल्याला कानदुखीचा त्रास होत असेल तर गुळ वापरणे फायद्याचे ठरू शकते.याप्रसंगी गुळ हा तुपासोबत खायचं आहे.तुपासोबत जर गुळ खाल्ला तर कान दुखी वर आराम मिळू शकतो.
9) सांधेदुखी : अनेकांना सांधेदुखीचा त्रास असतो.दूधासोबत जर गुळ घेतला तर सांधेदुखीचा त्रास दूर होऊ शकतो.तसेच आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यास आराम मिळू शकतो.
10) सर्दी आणि खोकला : हिवाळ्यामध्ये आणि पावसामध्ये अनेक लोक सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त असतात.अशा लोकांसाठी गुळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.यामुळेच आपणास हिवाळ्यामध्ये अनेक लोक गुळ खाताना दिसतात. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो.
11) लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन : आजच्या धकाधकीच्या जीवनात वजन वाढने ही सामान्य समस्या बनलेली आहे.जर आपणही वाढलेल्या वजनाने किंवा लठ्ठपणाने त्रस्त असालं तर रोज गुळाचा चहा घ्यावा.गुळाचा चहा घेतल्याने आपल्याला आपले वजन कमी करण्यास नक्कीच मदत मिळेल.
12) धातूंची झीज : विविध कारणांनी आपल्या शरीरातील धातूंची झीज होत असते आणि ही झीज लवकर भरून निघाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर होत असतात.त्यावर गुळ खाणं हा एक उत्तम गुणकारी उपाय आहे.
Conclusion :
मित्रांनो, या लेखाद्वारे आपल्याला गुळ खाण्याचे गुणकारी फायदे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.आजच्या आधुनिक जीवनात साखरेचं वाढलेलं प्रमाण अनेक आजारांना आमंत्रित करते.पूर्वीच्या काळात गुळाचा वापर हा सर्वत्र होत होता.त्यामुळे आजारही कमी होते.जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर जूनी परंपरा आत्मसाद करायला हवी.तेव्हा आपण आजारांवर मात करु शकतो.
प्रत्येकाने या गुणकारी गुळाचा वापर केला पाहिजे आणि इतरांनाही त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे.जर माहिती आवडल्यास आपल्या स्वकीयांपर्यंत जरूर शेयर करा.
धन्यवाद !
0 टिप्पण्या